दहीहंडा(प्रतिनिधी)- दहीहंडा पोलीस स्टेशन मध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी आरोपी सागर गजानन नवलकर, किसन विजय काबरा, प्रिन्स अरविंद तायडे ,कृष्णा मधुकर पवार सर्व रा कुटासा ता अकोट यांचे विरुद्ध 354 ड,294,506 ,34 ipc सह कलम 12 pocso प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून यामध्ये 2 आरोपी अटक आहेत, तर सागर गजानन नवलकर, किसन विजय काबरा हे फरार आहेत.
हकीकत आशा प्रकारे आहे यातील फिर्यादी हिची मुलगी कुटसा येथील 8 व्या वर्गात शिकत असून ती शाळेत जात असताना यातील सागर नवलकर हा नेहमी अश्लील गाणे म्हणत होता व तिला त्रास देत होता, व त्याचे सोबत यातील तिघे जण त्याला सहकार्य करत होते, पीडित मुलीच्या आई वडिलांनी त्यास समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांना दमदाटी करत होता अशा पीडितच्या आई च्या जबानी रिपोर्ट वरून पो स्टे ला गुन्हा दाखल असून pi देशमुख यांचे मार्गदर्शन खाली पुढील तपास psi शांतीलाल भिलावेकर , शाम बुंदेले, सुभाष वाघ करीत आहेत व फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
कुटासा येथे श्री शिवाजी विध्यालयाच्या गेटवर मोठ्या प्रमानात चिडीमार होते शाळा सुरु होण्यापुर्वी या गेट समोर काहि मुले उभी राहुन मुलीसोबत चिडीमार करतात येथील पोलीसांना माहीती असल्यावर सुद्धा पोलीस मात्र याकडे साफ दुर्लक्ष करतात म्हनुन अशे प्रकार घडतात आता याकडे वरीष्ठ अधीकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
या शाळेच्या गेटवर काही दुकाने लावलेली आहेत या दुकानावर विमल गुटखा तंबाखु यावर बंदी असुन सुद्धा या गावात मोठ्या प्रमानात गुटखा विक्री सुरु आहे अन्न व ओषध प्रशासनाचे साफ दुर्लक्ष प्रशासनाच्या सांगण्यानुसार शाळेच्या 100 फुटा जवळ कुठलेही पानटपरी किवा दुकान पाहीजेत नाही मात्र ईथे तर शाळेच्या गेटला लागुनच दुकाने लावलेली आहेत मात्र याकडे कुठलेही अधीकारी लक्ष देण्यास तयार नाही.
अधिक वाचा : अकोला शहरातील सहा काँक्रीट रस्त्यांचा सोशल ऑडिटचा अहवाल जाहीर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola