पातूर (शब्बीर खान) : तुझ्या मुलाला कापून टाकीन अर्थात मारुन टाकीन अशी धमकी देत मांडे ( पातळ चपात्या) बनविणाऱ्या आरोपीने एका महिलेवर सतत पाच महिने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून, पीडित महिलेच्या तक्रारीवरुन आरोपीच्या विरोधात पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. असगर अली हुसेन अली ( वय ४०) असे आरोपीचे नाव असून, वृत्त लिहीपर्यंत त्याला अटक करण्यात आली नव्हती.
आरोपी असगर अली हुसेन अली याचे मांडे (पातळ चपात्या) बनवियाचे दुकान असून, पीडित महिला पाच महिन्यांपूर्वी मांडे आणण्यासाठी त्याच्या दुकानात गेली होती. त्यावेळेस आरोपी असगर अली याने जबरदस्ती करून पीडितेसोबत जबरी संभोग केला आणि या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास तुझ्या मुलाला कापून फेकून देईल अशी धमकी दिली. त्यामुळेसदर महिलेने हा प्रकार कुणालाही सांगितला नाही; मात्र नंतरही अशाच प्रकारच्या धमक्या देत आरोपीने सदर पीडितेशी जवळीक निर्माण करून तिला लग्नाची आश्वासने देत सतत पाच महिने तिच्यावर लैगिक अत्याचार केले.
परंतु आपल्याला दिलेले आश्वासन आरोपीने पूर्ण न केल्याने पीडित महिलेने अखेरीस सोमवार, २२ ऑक्टोबर रोजी रात्री पातूर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरुन पातूर पोलिसांनी आरोपी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, वृत्त लिहिपर्यंत आरोपीला अटक झालेली नव्हती.
अधिक वाचा : जुगार अड्ड्यावर छापा;३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola