नवी दिल्ली : पेटीएम या ई-वॉलेट कंपनीचा मालक विजय शेखर शर्मा याच्याकडे २० कोटींची खंडणी मागण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शर्माची सचिव सोनिया धवन आणि तिच्या नवऱ्याला अटक करण्यात आली आहे. पेटीएमच्याच आणखी एका कर्मचाऱ्यालाही पोलिसांनी अटक केली असून या तिघांना शर्मा यांना पेटीएमने जमवलेली गुप्त माहिती जगजाहीर करण्याची धमकी दिली होती. विजय शेखर शर्मा यांनी गोतम बुद्ध नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तक्रारीमध्ये त्यांच्याकडे काम करणाऱ्यांनी गोपनीय माहिती चोरली असून ती जाहीर न करण्याच्या बदल्यात खंडणी मागत असल्याचं म्हटलं होतं. पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखत आरोपींच्या शोधासाठी पथकं तैनात केली होती. पोलिसांनी सोनिया धवन तिचा नवरा रूपक जैन आणि देवेंद्र कुमारला अटक केली. चौथा आरोपी मात्र फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांना अटक केलेल्या आरोपींकडून पेटीएम कंपनीचा महत्वाचा डेटा सापडला आहे. सोनिया ही या कंपनीमध्ये १० वर्षांपासून काम करत आहे तर देवेंद्र हा सात वर्षांपासून या कंपनीत कामाला आहे.
अधिक वाचा : दिवाळीत आतिषबाजी कायम; फटाके विक्रीला सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola