दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या विक्रीला सुप्रीम कोर्टाने मंगळवारी सशर्त परवानगी दिली. त्यामुळे नागिरकांना नेहमीप्रमाणे फटाक्यांसह दिवाळी आनंदाने साजरी करता येणार आहे. दरम्यान, फटाक्यांची ऑनलाइन विक्री करता येणार नाही, असे कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे ई-कॉमर्स साइट्सवरुन फटाके विक्रीला स्थगिती देण्यात आली आहे. फटाके विक्रीबाबत अंशतः घातलेली बंदी ही देशभरात लागू असून पर्यावरण रक्षणासाठी या आदेशांचे नागरिकांनी पालन करावे असे न्या. ए. के. सिक्री आणि न्या. अशोक भुषण यांनी निर्णय देताना म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टाने देशभरात सरसकट फटाके विक्रीच्या बंदीला नकार दिला आहे. मात्र, कमी प्रदुषण करणाऱ्या फटाक्यांचीच विक्री केली जावी असे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर फटाक्यांची ऑनलाइन विक्री करण्यावर कोर्टाने बंदी घातली आहे. त्यामुळे अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना फटाके विक्री करता येणार नाही.
त्याचबरोबर, दिवाळीच्या रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडता येणार आहेत. तर नाताळ आणि नवीन वर्षाला रात्री ११.४५ ते मध्यरात्री १२.३० पर्यंत अर्थात पाऊण तास फटाके फोडता येतील, असे कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
अधिक वाचा : शबरीमाला मंदिरात आंदोलन सुरु; दोन महिला पोहोचल्या मंदिर परिसरात
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola