मुंबई : बिग बॉसचे १२ वे सिझन सुरू होऊन महिना उलटलेला नसतानाही बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची मजल एकमेकांसोबत हाणामारी करण्यापर्यंत पोहोचली आहे. नुकतीच वाईल्ड कार्ड म्हणून प्रवेश केलेली रोडीज फेम सुरभी राणाने घर अगदी डोक्यावर घेतले आहे. एका वाईल्ड कार्ड एन्ट्रीने घरात भांडणांवर भांडणं होत असताना आता दुसरा वाईल्ड कार्ड स्पर्धक घरात प्रवेश करणार आहे. अभिनेत्री व युवराज सिंगची माजी प्रेयसी किम शर्मा लवकरच बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे
बिग बॉसच्या मागच्या सिझनमध्ये युवराज सिंगच्या भावाची घटस्फोटीत पत्नी आली होती. तिने युवराजचा भाऊ व त्याच्या आईवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता युवराजची माजी प्रेयसी किम शर्मा या घरात प्रवेश करणार आहे. किम आणि युवराजचे बरेच वर्ष अफेयर होते. मात्र युवराजच्या आईला त्यांचे प्रेमसंबंध मान्य नसल्याने युवराजने किमसोबतचे नाते तोडल्याचे बोलले जाते. त्यानंतर युवराज अभिनेत्री हेजल किचसोबत लग्नबंधनात अडकला. तर किम हिंदुस्थानी वंशाच्या नायजेरियन उद्योगपतीसोबत लग्न करून तेथे स्थायिक झाली होती. मात्र किमचा नवरा अली याला दुसरी महिला आवडायला लागल्याने किम व त्याचा देखील घटस्फोट झाला आहे. त्यामुळे कायम चर्चेत राहिलेली किम घरात आल्यानंतर काय गोंधळ घालते ते बघण्यासारखे असेल.
अधिक वाचा : #MeToo : आलोकनाथ यांनी विनता नंदाविरुध्द दाखल केली मानहानीची तक्रार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola