अकोला : येथील सुधीर कॉलनी ते पिकेव्ही येथील टी पॉईंट पर्यंत डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्याची आज सकाळी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक हरीष अलीमचंदानी, नगरसेवक आशिष पवित्रकार, डॉ. अशोक ओळंबे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती. सदर रस्त्यावर रोज सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे पालकमंत्री यांच्या पुढाकाराने या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. आज स्वतः पालकमंत्री यांनी रस्त्याची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांसोबत त्यांनी रस्त्यावर फेरफटका मारला. रस्त्याचे डांबरीकरण केल्याबद्दल नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
अधिक वाचा : विद्युत भारनियमन बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola