मूर्तीजापुर (प्रतिनिधी) : मूर्तीजापुर तालुक्यातील हिरपूर(सांजापुर) येथील मुळ रहीवाशी असलेल्या मालु रामकृष्ण गवई यांच्या “काही ना काही” या गिताला टँलेंन्ट हंट प्रोडक्शन या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक प्रेम मलहोत्रा व सुधीर गौतम यांनी येणाऱ्या “विंटर नाईट” या चित्रपटात स्थान दिले आहे. मालूताई गवई यांचे जेमतेम दहावी पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांनी लिहीलेले गित ” काही ना काही” हे फेसबुकच्या माध्यमातून पाठविलेले गित “विंटर नाईट” या चित्रपटासाठी रेकॉर्डिंग झाल्याने भविष्यात गितकार म्हणून चित्रपटात व्यासपीठ निर्माण झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.टँलेंन्ट हंट प्रोडक्शन या चित्रपटाचे निर्माता,दिग्दर्शक प्रेम मलहोत्रा व सुधीर गौतम असुन विक्की झाडेवाकर याची कथा आहे. गीतकार मालु गव ई,आणि मुख्य कलाकार विवेक गुप्ता, अल्कराज कोमल खरवंदा,विशाल शर्मा, अनुष्कासिंह,हिमांशू व बजरंगी भाईजान फेम मनोज बक्क्षी,राधे मोहन गुप्ता, निरूपमा गुप्ता, अतुल रिस्ती आहेत. संगितकार बिटटु इंदोरीया व छायांकन निदर्शक जितेंद्र पिंटू, राहुल राजपूत आहेत.
अधिक वाचा : डीआरएम यादवांकरवी अस्वच्छतेबाबत रेल्वेस्थानकावर संबंधितांची कानउघाडणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola