अकोला : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अकोला जिल्हाध्यक्ष पदावर माजी नगरसेवक आणि युवा उद्योजक पंकज साबळे यांची आज नियुक्ती करण्यात आली.
गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यात मनसे या पक्ष्याला सतत लोकांमध्ये चर्चेत ठेवण्याचे काम पंकज साबळे यांनी सातत्याने केले आहे.साबळे विविध क्षेत्रात सतत पुढाकार घेणारे तरुण असून सकल मराठा समाजाच्या गठन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे,.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुढील आठवड्यात होणाऱ्या अकोला दौऱ्याच्या पृष्ठ भूमीवर पंकज साबळे यांची नियुक्ती महत्वपूर्ण मानली जात आहे.
मनसेच्या स्थापनेपासून जिल्ह्यात अनेक संधीसाधू आले नि गेले मात्र पक्ष्याला यश मिळो किंवा अपयश जे मोजके लोक निष्ठा ठेवून आहेत त्यात पंकज साबळे यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते,या नियुक्तीमुळे तरुणांचा मोठा प्रवाह मनसेकडे आकृष्ठ होईल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola