पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्ली पोलिस आयुक्तांना याबाबतचा मेल आला असून हा नेमका कोणी पाठवला आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र या मेलमुळे मोदींच्या जीवाला धोका असल्याचे समोर आले आहे. या मेलमुळे सुरक्षा यंत्रणा आणि दिल्ली पोलिस सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.प्राथमिक अंदाजानुसार हा मेल पूर्वेकडील राज्यातून आल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या स्तरावर चौकशी सुरु असून पूर्ण चौकशी झाल्यानंतरच यामागे कोणाचा हात आहे ते समोर येईल. याआधीही काही महिन्यांपूर्वी माअोवाद्यांकडून मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
अधिक वाचा : #MeToo प्रकरणांच्या तपासासाठी समिती स्थापन करणार- मेनका गांधी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola