मूर्तीजापुर दि.१२ (प्रकाश श्रीवास ) : शहरातील स्टेशन विभागातील आदर्श काँलनीतील एका महीलेचे मंगळसुत्र अज्ञाताने दुचाकीवरून हिसकावून पळ काढल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आदर्श काँलनी येथील रहिवासी सुषमा दिपक आष्टीकर ही महिला आपल्या घरी जात असताना त्यांच्या गळयातील मंगळसूत्र हिसकावून अज्ञान दुचाकीवरून आलेल्या इसमाने पळ काढला. उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सुषमा आष्टीकर हया गजानन महाराज मंदीरातून घरी परत जात असताना त्यांच्या मागुन आँलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने त्याच्या गळतील आठ ग्रँम वजनाचे सोन्याचे मंगसुत्र हिसकावुन पळ काढला. घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच तात्काळ नाकेबंदी करण्यात आली. मा आरोपी हाती मिळाला नाही. शहरात विना नंबरच्या अनेक दुचाकी वाहने फिरत आहे. त्यामधील एक अज्ञात आरोपीने हे काम दाखविले असल्याची माहिती आहे. पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन विना नंबळच्या आणि अज्ञात वाहन धारकांची चौकशी करून व ज्यांनी वाहन खरेदी केले पण वाहनावर नंबर टाकला नाही. अशा वाहनधारकाविरूध दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी जेणेकरुन चैनस्नँचिंगचे आरोपीच्या मुसक्या आवळने शक्य होईल. अज्ञात विना नंबरची दुचाकी शहरात आढळून आल्यास तात्काळ शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दतात्रय आव्हाडे यांचेशी संपर्क साधावा.
अधिक वाचा : मूर्तीजापुर चे बसस्थानक झाले जिर्ण; केव्हाही घडु शकते अघटित घटना
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola