मुंबई : राज्यातील पाणीटंचाई परिस्थितीची प्रत्येक तालुक्यात जाऊन पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना दिले आहेत. या पाहणी दौऱ्याचे नियोजन करण्याची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे सोपविली आहे. या दोन्ही मंत्री महोदयांच्या समितीची आज बैठक झाली. या बैठकीत प्रत्येक मंत्र्यांच्या दौऱ्याचे नियोजन तयार करण्याचे काम सुरु केले असून येत्या आठ दिवसात हे दौरे सुरू होणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळ निवारणासाठीच्या नियोजनाची जबाबदारी श्री. पाटील व श्री. रावते यांच्याकडे सोपविण्यात आली होती. या दोन्ही मंत्रिमहोदयांची आज सकाळी बैठक झाली. त्यावेळी सर्व मंत्र्यांच्या दौऱ्याचे वेळापत्रक तयार केले आहे. या दौऱ्यानुसार प्रत्येक मंत्री महोदयांना किमान पाच तालुक्यात प्रत्यक्ष जाऊन तेथील जनतेशी संवाद साधण्याच्या व तालुक्यात आढावा बैठक घेण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. त्यानंतर अहवाल मुख्यमंत्री महोदयांना सादर करणार आहेत.
अधिक वाचा : रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola