अकोला (योगेश नायकवाडे) : अकोला जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी महावितरण कंपनीने भारनियमन सुरु केले आहे.ते भारनियमन त्वरित बंद करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुषार दादा पुंडकर यांनी अधिक्षक अभियंता (ग्रामीण) यांना निवेदन दिले.निवेदनानुसार शेतकरी वर्ग रात्री बेरात्री शेतात पाणी देतात त्यामुळे शेतकऱ्याला खूप त्रास सहन करावा लागतो तसेच दुष्काळी परिस्थिती उदभवलेली आहे आणि त्यात भारनियमन ह्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्येला प्रवूत्त व्हावे लागते.तसेच नवरात्री उत्सवात भारनियमन सुरु करणे कितपत योग्य आहे यावरून शासनाची व आपली मानसिक दिवाळखोरी दिसून येते असे तुषार दादा पुंडकर यांचे म्हणणे आहे.
तसेच विज बिलाची थकीत रक्कम अदा केल्या शिवाय नादुरुस्त रोहित्राच्या जागेवर नवीन रोहित्र बसवू नये असा आदेश महावितरण कंपनीने काढला आहे.या आदेशामुळे शेतकर्यासमोर समोर नविनच संकट उद्भवले आहे.हा आदेश त्वरित रद्द करावा व शेतकऱ्यांना दिवसाचा विज पुरवठा वेळ ८ तासाऐवजी 12 तास देण्यात यावी कारण रात्रीच्या सुरु असलेल्या विजेमुळे शेतकऱ्यांना रात्रभर जागावे लागते व अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन भारनियमन त्वरित रद्द करावे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष अकोला जिल्याच्या वतीने अधिक्षक अभियंता (ग्रामीण) ह्यांच्या कार्यालया विरुद्ध तिव्र आंदोलन छेडणार आहे असे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुषार दादा पुंडकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्ह्ध्यक्ष तुषार दादा पुंडकर,योगेश दादा पाटील युवक जिल्हाध्यक्ष,बिट्टूभाऊ वाकोडे,शामभाऊ राऊत,उमेश पाटील,अरविंद पाटील,गणेश भोसले,कमल कुत्तरमारे,लखन चोरे,अजय खळे,गौरव खंडारे,कुणाल कामळे आदी उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola