नवी दिल्ली : आएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पूत्र कार्ती चिदंबरम याची ५४ कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. कार्ती यांची देशातील नवी दिल्ली, उटी, तामिळनाडूतील कोडईकनाल येथील बंगले तसेच विदेशातील ब्रिटन आणि स्पेन येथील मालमत्ता जप्त केली आहे.
याआधी कार्ती चिदंबरम याला अटक करण्यात आली आहे. सीबीआयने नोंद केलेल्या एफआयआर नुसार ईडीने मनी लाँडरिंग कायद्याखाली ही कारवाई केली आहे. कार्ती याची ब्रिटनमधील कॉटेस आणि घर आणि स्पेनमधील बार्सिलोना येथील टेनिस क्लबची मालमत्ता जप्त केली असल्याची माहिती ईडीने दिली आहे. तसेच कार्ती याच्या ॲडव्हाटेज स्टॅटेजिक कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड (एएससीपीएल) च्या नावाने बँकेतील ९० लाख रुपयांची कायम ठेव रक्कम देखील जप्त केली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार एफआयपीबीची परवानगी घेता ४.६२ कोटींऐवजी ३०५ कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक आयएनएक्स मीडियात करण्यात आली. एफआयपीबीने आयएनएक्सकडे खुलासा मागितल्यानंतर येथे कार्तीचा संबंध येण्यास प्रारंभ झाल्याचा आरोप सीबीआयने केला.
अधिक वाचा : ज्येष्ठ विधिज्ञ तुषार मेहता भारताचे नवे महाधिवक्ता
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola