अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असून, रुग्णालय प्रशासनात भ्रष्टाचार फोफावला असल्याचा आरोप आक्रमण संघटनेने केला आहे. संघटनेच्या सदस्यांनी मंगळवारी सर्वोपचार रुग्णालयासमोर ‘डफडे बजाओ’ आंदोलन करीत धरणे दिले. यावेळी मागण्यांचे निवेदन अधिष्ठातांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. कधी जागा तर कधी औषधांचा अभाव असल्यामुळे सरकारी रुग्णालयाची पायरी चढणे सर्वसामान्यांना आता नकोसे वाटत आहे. सर्वोपचार रुग्णालयात चाचण्यांसाठी ताटकळलेल्या रुग्णाच्या वाढती संख्या आहे. या रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसीत सामुग्री उपलब्ध आहे मात्र ते चालविणारे तंत्रज्ञ नाहीत परंतु रुग्णांचा भार हे कारण देत अनेक वेळा रुग्णालयाच्या अनागोंदी कारभारावर पांघरुण घातले जाते. सर्वोपचार रुग्णालयात वेळेत तपासण्या केल्या जात नाहीत, म्हणून असे रुग्ण परस्पर खासगी प्रयोगशाळांना आंदण दिल्याचे समोर आले आहे. विविध चाचण्या खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यास सांगून रुग्णांच्या खिशाला कात्री लावली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रुग्णालयांमध्ये औषधांचा खडखडाट आहे. दुसरीकडे रुग्णालयात पुरेशा परिचारिका व कर्मचारी नसल्याने तिथल्या कर्मचाNयांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले आहे. अकोला वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला इथे रूग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध असतांना वैद्यकीय अधिकारी व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने इथे रुग्णांचे हाल होत आहेत डॉक्टरची मनमानी, औषधे उपलब्ध नाही, डॉक्टर वेळेवर येत नाही, रुग्ण औषधांविना मृत्यू पावत आहेत, त्या निषेधार्थ आक्रमण संघटना अकोलाच्या वतीने डफडे वाजवून निषेध करण्यात आला.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना सरकारी रुग्णालये हा एकमेव आधार असतो. मात्र सध्या ही परवडणारी आरोग्य सेवा रुग्णांसाठी मनस्तापाचे कारण ठरत असल्याचे चित्र आहे. अकोला सर्वोपचार रुग्णालयात ५०० खाटांची संख्या वाढविण्यात आली असून, हे रुग्णालय लवकरच मल्टिसुपर स्पेशल हॉस्पिटलमध्ये रूपांतरित होणार असल्याचे गाजर दाखविले जात आहे; मात्र अकोला सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना एका खाटीवर ३ रुग्ण एकाच वेळी उपचार घेत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. सध्या व्हायलर आजारांच्या रुग्णांची संख्या मोठी आहे, त्यातच अपुरी औषधे, चाचण्यांचा अभाव, कर्मचाNयांची कमतरता आणि अन्यही विविध कारणांमुळे रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची परवड होत असल्याचे गेल्या काही दिवसंपासून समोर येत असतांनाही सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाने लक्ष दिले नाही त्यामुळे मंगळवारी आक्रमण संघटनेच्यावतीने रुग्णालय परिसरात डफडे बजाव आंदोलन करण्यात आले.
अधिक वाचा : ‘लोकराज्य’ च्या विशेषांकाचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola