तेल्हारा (प्रतिनिधी) : एस टी चा प्रवास सुखाचा प्रवास असे ब्रीद वाक्य घेऊन परिवहन विभाग कारभार चालवत आहे मात्र तेल्हारा आगारकडून या ब्रीद वाक्याला हरताळ बसत असून तेल्हारा आगर प्रशासन प्रवाशांच्या जीवावर उठले असून आज दुपारी एक वाजता गायगाव जवळ अचानक बसचे टायर फाटले यावेळी चालकाने प्रसंगावधान राखल्याने पुढील अनर्थ टळला.
तेल्हारा आगराची बस क्र एम एच ४०-९३२७ ही बस दुपारी १२ वाजता अकोल्यावरून तेल्हारा कडे निघाली असता गायगाव जवळ बसचे टायर फाटले टायर अचानक टायर फाटल्याने अचानक काय झाले कोणाच्या लक्षत आले नाही यावेळी बसमधील प्रवाशांची एकच तारांबळ उडाली होती.टायर फाटल्यानंतरही बस बऱ्याच दूर जाऊन चालकाने थांबवलि.तेल्हारा आगराच्या बस नेहमीचे बंद पडतात.याचा फटका हा सर्व सामान्य प्रवाशांना बसत असून नाहक दुसरी बस येई पर्यंत ताटकळत बसावे लागते.तर प्रवाशांसोबत अशा घटना नेहमीच घडत असल्याने तेल्हारा आगराच्या बस हा जीवघेण्या ठरत आहेत.मात्र आगार प्रशासन भोंगळ कारभारात मग्न आहे.
अधिक वाचा : अकोला हत्याकांड…मंदिराचा पुजारीच निघाला आकाशचा मारेकरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola