अकोट (कुशल भगत): गणेशोत्सवा नंतर अतिशय अस्वच्छ झालेल्या पूर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी रविवारी चोहोटा , करतवाडी रेल्वे ,व धामना येथील तरुणांनी पुढाकार घेत स्वच्छ पूर्णा अभियान राबवल. सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरनात साजरा झाला व विसर्जनही, परंतु त्यानंतर गांधीग्राम येथील पूर्णा नदीची अवस्था ही न पाहण्यासारखीच होती. यामुळे नदी पात्र आणि त्यातील पाणी पूर्णतः अशुध्द झालं होतं, ही बाब सामाजिक कार्य करणाऱ्या तरुण वर्गाला न पटणारीच होती. त्यासाठी चोहोटा बाजार , करतवाडी रेल्वे , धामणा , येथील तरुणांनी माणुसकीच दर्शन देत रविवारचा पूर्ण दिवस तापत्या उन्हात श्रमदान करीत पूर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी घालवला. यावेळी दहीहंड्याचे ठाणेदार प्रदीप देशमुख,
गांधीग्रामचे सरपंच आनंदराव कठोळे यांनी भेट दिली.या उपक्रमात गणेश मेनकार करतवाडीचे सरपंच सुदर्शन किरडे , दशरथ वडाळ , योगेश किरडे ,अमोल राने, अमित बुंदे, शाम वडाळ ,भुषण वडाळ, हरिओम काकडे ,शिवदास वडाळ, शुभम वडाळ ,गणेश आढे, पवन मोरे ,बलवंत काकडे, नितिन बद्रे ,कुलदिप मानकर, देवानंद बुंदे , प्रज्वल बुंदे , सुयोग बुंदे ,सुयोग वडाळ ,आदेश वडाळ, रामा लांडे ,अविनाश बुंदे, प्रनव वडाळ ,जय वडाळ , पवन वर्मा आदींनी परिश्रम घेतले.