अडगाव बु (गणेश बुटे): बसचालकाने एका ऑटो धडक देऊन बस सुसाट वेगाने धडक मारल्यानंतर बस घेऊन पळून गेला.यामध्ये ऑटोमधील प्रवासी जखमी झाले असून ऑटोचे नुकसान झाले. जळगाव (जा) वरून चांदुर रेल्वे कडे जाणाऱ्या बस क्रमांक एम एच ४०-६३०८ क्रमांकाच्या बसच्या चालकाने अडगाव येथून अकोट कडे प्रवाशी घेऊन जात असताना बोर्डी नाल्याजवळ सदर बस चालकाने निष्काळजी दाखवून ऑटो ला धडक दिली.
धडक एवढी जबर होती की ऑटो रस्त्याच्या कडेला पलटी झाला.तर बसचालकाने धडक दिल्यानंतर घटनास्थळी न थांबता तिथून बस सुसाट वेगाणे अकोट कडे नेऊन पोबारा केला.यामध्ये ऑटो मधील प्रवाशी जखमी झाले असून ऑटो चालक निलेश वसु यानी सदर बस चालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये बसचालकविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.