अकोला (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या अकोला महानगर अध्यक्ष पदी भूषण ताले पाटील यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. रवि वैद्य यांच्या सुचनेनुसार अकोला जिल्हाध्यक्ष मा. निलेश किरतकार यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. ताले यांची सामाजिक कार्यात असलेली ओढ आणि पोलिसांप्रति काम करण्याची तळमळ आणि आवड पाहून त्यांनी या पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
आपण सतत पोलीस आणि त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणार्थ काम करू, अस यावेळी बोलताना ते म्हणाले. महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन ही पोलीस आणि त्यांच्या कुटुंबासाठी काम करणारी राज्यातील एकमेव आणि अग्रगण्य संघटना आहे. संघटनेने पालिसांच्या पाल्यांना पोलीस भरती मध्ये 5 % आरक्षण मिळवून दिले आहे. ही संघटना सदैव पोलिसांच्या कल्याणार्थ काम करत असते. संघटनेच्या राज्यभर शाखा आहेत.
यावेळी संघटनेचे विदर्भ उपाध्यक्ष अजय ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष महेश गावंडे, जिल्हा युवा आघाडीचे शिवराज इंगळे, विद्यार्थी आघाडीचे तुषार ताले, क्रिडा आघाडीचे रणजित गावंडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. मंगलाताई सुभाषराव म्हैसने आणि संघटनेचे समस्त पदाधिकारी उपस्थित होते.
भूषण ताले यांच्या निवडी साठी विदर्भ अध्यक्ष डॉ. श्याम चव्हाण, अमरावती विभागीय अध्यक्ष विनोद तायडे, जिल्हाध्यक्ष निलेश किरतकार, जिल्हा संपर्क प्रमुख अश्विन पितांबरवाले (राठोड) यांनी त्यांच्या कामाचे कौतुक करून अभिनंदन केले तसेच त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola