अकोला- २८ वर्षीय युवकाने घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हिंगणा फाटा येथे गुरुवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी खदान पोलिसानी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. योगेश समाधान तायडे हा युवक कंपनीमध्ये नोकरीला आहे. गुरुवारी दुपारी घरात कुणी नव्हते.
युवकाचे वडिल दुपारी अडीच वाजता घरी आले असता त्यांना मुलगा योगेश हा छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी घटनेची माहिती खदान पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले.पोलिसांनी पंचनामा करून युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवला. युवकाजवळ चिठ्ठी किंवा आणखी काही दिसून आले नाही. युवकाच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. खदान पोलिस युवकाच्या मृत्यूमागे नेमके काय कारण असावेे, याचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे याच परिसरात महिन्याभरात तिघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. युवकाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा तपास खदान पोलिस करीत आहेत.
अधिक वाचा : डॉ.श्याम केला व डॉ.डी.एच.राठी यांना उच्च न्यायालयाकडून जामीन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola