अकोट (प्रतिनिधि) : गेल्या पाच महिन्यांपासून केवळ अकोला जिल्हाच नव्हे तर संपूर्ण विदर्भात गाजत असलेल्या व उच्चभ्रू लोकांत चर्चेचा विषय राहिलेल्या बोगस डॉ.निखिल गांधी प्रकरणात आधी तक्रारकर्ता व नंतर पोलीस तपासात सहआरोपी करण्यात आलेल्या डॉ.श्यामसुंदर केला यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कालच अटकपूर्व जामीन मंजूर केला असून याच प्रकरणातील तिसरे सह आरोपी डॉ.गणेश रामकरण राठी यांना देखील आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
बोगस डॉ.निखिल नंदकिशोर गांधी याच्या विरुद्ध आकोट शहर पोलीस स्टेशनला शहरात सिटी क्रिटिकल केअर हॉस्पिटल चालविणारे डॉ.श्यामसुंदर वल्लभदास केला यांनी त्यांची खोटी कागदपत्र देऊन फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दिली होती.याबाबत आकोट शहर पोलिसांनी चौकशी करून अपराध क्र.२४१/२०१८ प्रमाणे गुन्हा दाखल करून भादवीच्या कलम ३३६,४०६,४२०,४६९, ४७१ व २४ तसेच १९६१ च्या मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्टच्या कलम ३३ नुसार कलमे लावण्यात आली होती,तर पुढे याच प्रकरणात बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्टची ३ व ६ ही कलमे वाढविण्यात आली होती. सदरहू प्रकरणात निखिल गांधी याला अकोटच्या न्यायालयातून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता.
मात्र जवळपास एक महिन्याच्या कालावधीनंतर पोलिसांचे म्हणणे ग्राह्य धरून न्यायालयाने त्याचा जामीन रद्द केला होता.त्यानंतर गांधीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून अटकपूर्व जामीन मिळविण्याचा देखील प्रयत्न केला परंतु न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. निखिल गांधीला उच्च न्यायालयाने देखील जामीन नाकारल्यावर त्याने दि.१४/९/२०१८ ला आकोट शहर पोलिसांसमोर शरणागती पत्करली.पोलिसांनी त्याची पाच दिवसांची पोलीस कोठडी घेऊन तपासाला गती दिली.तेव्हापासून म्हणजेच दि. १९/९/२०१८ ला बोगस डॉ.निखिल गांधी याची अकोला जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यानच्या काळात दि.१६/८/२०१८ ला गुन्हा दाखल झाल्यापासून डॉ.श्याम केला हे फरार झाले होते तर याच प्रकरणात दि.२४/८/२०१८ ला सह आरोपी करण्यात आल्यापासून डॉ.डी.एच.राठी सुद्धा फरार झाले होते. या दोघांनीही अकोटच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता मात्र न्यायालयाने ते फेटाळून लावले होते.तेव्हापासून डॉ.श्याम केला व डॉ.राठी हे दोघेही आकोट पोलिसांना गुंगारा देत चौकशीपासून लांब राहण्यात यशस्वी झाले होते.
डॉ.श्याम केला व डॉ.डी. एच.राठी यांनी उच्च न्यायालयात त्यांच्याविरुद्ध आकोट शहर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला एफआयआर क्रश करण्यासाठी याचिका दाखल केलेली असून त्यावर याच महिन्यात दि.२३/१०/२०१८ ला सुनावणी ठेवण्यात आली आहे.मात्र तोपर्यंत याप्रकरणात कोणत्याही प्रकारचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल न करण्याचे पोलिसांना निर्देश दिले आहेत.
अधिक वाचा : सायबर गुन्हेगारांचे आहे लक्ष, रहा दक्ष; SWAS टिमचे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola