अकोला – 22 वर्षीय युवक व 20 वर्षीय युवती या दोघांनी सोमवारी दुपारी डाबकी रेल्वे गेटच्या जवळील गायगाव रोडवरील बाराखोली जवळ रेल्वेखाली उडी घेतली. त्यात युवकाचा मृत्यू झाला. तर युवती गंभीर जखमी झाली. युवतीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रेमप्रकरणातून दोघांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली आहे.
देविदास गोपाल धकीते असे त्या युवकाचे आहे. दोघेही हरिहर पेठेतील रहिवासी आहेत. त्यांच्या प्रेमसंबधाला दोघांच्याही घरचा विरोध असल्याने त्यांनी सोमवारी 1 ऑक्टोबरला दुपारी गायगाव रोडवरील बाराखोली परिसर गाठला. तेथे काही वेळ एकत्र राहिल्यानंतर त्यांनी साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास महाराष्ट्र एक्स्प्रेससमोर उडी घेतली. त्यात देविदास धकीतेचा मृत्यू झाला. तर युवती गंभीर जखमी झाली. या वेळी नागरिकांनी युवतीला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
हरिहर पेठेतील रहिवासी देविदास गोपाल धकीते (22) व याच परिसरातील रहिवासी युवतीचेे प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांच्या विरोधानेे सोबत राहता येत नसल्याने या प्रेमीयुगलाने गायगाव रोडवरील बाराखोली परिसर गाठला. येथे त्यांनी रेल्वेखाली उडी घेऊन सोबतच आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात युवक रेल्वेखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला, तर युवती दूर फेकल्याने ती गंभीर जखमी झाली. दरम्यान. युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांनी सर्वोपचार रुग्णालयात पाठवला तर गंभीर जखमी युवतीलाही उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले. या युवतीवर उपचार करण्यात येत असून, तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
अधिक वाचा : कुंटनखाण्यावर छापा; देहविक्रीय करणाऱ्या चार तरुणी पोलिसांच्या जाळ्यात
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola