अकोला (शब्बीर खान) : अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या, बाभूळगाव येथील 31 वर्षीय विवाहित महिलेने, अंगावर रॉकेल अंगावर ओतून त्यानंतर जाळून घेऊन आत्महत्या केली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बाभूळगाव येथील वैशाली बळकट 31वर्षीय महिलेने दिनांक 30 सप्टेंबरच्या सायंकाळी स्वतःच्या अंगावर रॉकेल घेऊन जाळून घेतले,यामध्ये वैशाली बळकट ही 65 टक्के भाजली, तिला उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे उपचारासाठी भरती करण्यात आले, उपचारादरम्यान 1 ऑक्टोबर रोजी तिचा मृत्यू झाला.मृतक महिलेचे माहेर वाशीम जिल्ह्यातील, रिसोड तालुक्यातील मोप गाव असून सन2005 मध्ये तिचा विवाह झाला होता. तेव्हा पासून मृतक महिलेचा पती याला दारूचे व्यसन जडले होते.दारुड्या पती नेहमी दारूसाठी पैशाची मागणी करत असायाचा, पैसे दिले नाही की,मारझोड करायचा,नेहमीच्या छळाला कंटाळुन दि. रोजी रॉकेल टाकून जाळून घेऊन आत्महत्या केली.मृतक महिलेच्या पित्याच्या तक्रारीवरून आत्महत्येच्या गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पती गणेश बळकट याला अटक केली असून पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola