नवी दिल्ली : SBI बँकेने आपल्या एटीएम कार्डमधून काढता येणाऱ्या रकमेत मोठी घट केली आहे. एका दिवसाला फक्त 20 हजार रुपयेच आता एटीएममधून काढता येणार आहेत. 31 ऑक्टोबरपासून हा नियम लागू होणार आहे. SBI ने ‘Classic’ आणि ‘Maestro’ कार्ड धारकांसाठी हा नियम लागू केला आहे. सध्या या कार्डवर दिवसाला 40 हजार रुपये काढता येतात. ऐन सणासुदीच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आल्यानं अनेकांना त्रास सहन करावा लागणार आहे.