अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं केला आहे. ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचा किस्सा सांगताना तनुश्री हिनं हा गौप्यस्फोट केला आहे.
२००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटासाठी एका स्पेशल गाण्याचं चित्रीकरण सुरू होतं. त्यावेळी नाना पाटेकर चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते. चित्रीकरणाच्या करारानुसार ते गाणं खरंतर केवळ माझ्या एकटीवर चित्रीत होणं अपेक्षित होतं. मी हा प्रकार दिग्दर्शक आणि निर्मात्यांना सांगितला, पण त्यांनीही मला नाना पाटेकर सांगेल तसं करण्यास सांगितलं होतं, असा खळबळजनक खुलासा तनुश्री हिनं एका मुलाखतीत केला आहे.
बॉलिवूडमधील अनेकांना नाना पाटेकर महिला कलाकारांशी असभ्य वर्तन करतात हे माहीत आहे. याशिवाय त्यांनी महिला कलाकारांना सेटवर मारहाण केल्याचंही प्रकरण घडलं आहे. पण यावर बोलायची कुणाची हिंमत होत नाही, असंही तनुश्री म्हणाली. इतकंच नाही तर नाना पाटेकर यांनी गुंडांकरवी मला आणि माझ्या कुटुंबियांना धमकावल्याचंही तनुश्रीने सांगितलं आहे.
तनुश्री दत्ता हिने २००५ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘आशिक बनाया आपने’ सिनेमातून ती प्रकाशझोतात आली होती. त्यानंतर ढोल, चॉकलेट, रिस्क आणि स्पीडसारखे चित्रपट तनुश्रीने केले आहेत. मात्र, गेल्या ८ वर्षांपासून तनुश्री बॉलिवूडपासून दूर आहे.
अधिक वाचा : जॉनच्या ‘बाटला हाउस’ चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola