दहिहांडा (शब्बीर खान): जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांच्याऐवजी इतरांकडे द्यावा, अशी मागणी शिक्षण समितीने केल्यानंतर प्रभार सोपवलेल्या संध्या कांगटे दोन दिवसानंतरच दीर्घ रजेवर गेल्या आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभाग पुन्हा एकदा वाºयावर आहे. शिक्षण समितीच्या १३ जुलै रोजी झालेल्या सभेत प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार देण्याबाबत चुकीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यामध्ये अनियमितता करण्यात आली. त्यामुळे कारवाई करण्याचा ठराव घेण्यात आला.
सेवाज्येष्ठतेनुसार प्राथमिक उपशिक्षणाधिकारी संध्या कांगटे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे यांच्याकडे प्रभार देणे आवश्यक होते; मात्र प्रभार माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांच्याकडे देण्यात आला. तो काढून घ्यावा, चुकीचा प्रस्ताव सादर करणाºयांवर कारवाई करावी, असा ठराव १३ आॅगस्ट रोजीच्या बैठकीत सदस्य संतोष वाकोडे यांना मांडला. ज्योत्स्ना चोरे यांनी अनुमोदन दिले. त्या ठरावानुसार कार्यवाही करावी, असे पत्र शिक्षण सभापती पुंडलिक अरबट यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले. त्यानुसार अवचार यांना कार्यमुक्त करत संध्या कांगटे यांना प्रभार देण्यात आला. त्यांनी दोन ते तीन दिवस काम पाहिल्यानंतर लगेच दीर्घ रजेवर गेल्या. त्यामुळे पदवीधर शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार करण्याची मुदतही प्रशासनाला पाळता आली नाही. सेवाज्येष्ठता यादी अंतिम करणाऱ्या समितीच्या अध्यक्षपदी कांगटे यांना जबाबदारी देण्यात आली होती. ती यादीही रखडली आहे. त्यातच शिक्षण विभागातील दैनंदिन कामकाजही प्रभावित झाले आहे. शिक्षण विभाग पुन्हा एकदा वाऱ्यावर सोडण्यात आला आहे.
अधिक वाचा : आदेश न स्वीकारणाऱ्या पाच शिक्षकांविरुद्ध गुन्हे दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola