टाटा कंसल्टिंग कंपनी भारतात खासगी क्षेत्रातील सर्वात जास्त रोजगार देणारी कंपनी आहे. भारतभर पसरलेल्या त्यांच्या शाखांसाठी ते कँम्पस इंटरव्ह्यू घेत होते. त्या माध्यमातून अभियांत्रिकी क्षेत्रात पदवी घेतलेल्या तरुण मुलांची मोठ्या प्रमाणात टीसीएस भरती करत होती. पण, आता टीसीएस ही कँम्पस इंटरव्ह्यूची पध्दत बंद करणार आहे.
भारतातील जवळपास ३७० महाविद्यालयात दरवर्षी टीसीएस कँम्पस इंटरव्ह्यू घेते. त्यामुळे हजारो फ्रेशर्सना रोजगाराची संधी उपलब्ध होत होती. भारतातील फक्त ३७० कॉलेजमध्ये जावून तेथे कँम्पस इंटरव्ह्यू घेवून भरती करणे वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यामुळेच टीसीएसने ही प्रक्रिया आता ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती एच. आर. विभागाचे उपाध्यक्ष अजोय मुखर्जी यांनी दिली.
टीसीएसने कँम्पस इंटरव्ह्यूची प्रक्रिया ऑनलाईन केल्याने भारतातील जवळपास १०० शहरांतील २००० कॉलेजमधील मुलांना अर्ज करण्याची संधी मिळाणार आहे. यामुळे आधीच्या तुलनेत जवळपास १७५ टक्के जास्त मुलांना अर्ज करता येणार आहे. तसेच या प्रक्रियेमुळे ३ ते ४ महिने लागणारा वेळ ३ ते ४ आठवडे इतका कमी होणारा आहे.
टीसीएस या प्रक्रियेद्वारे संपूर्ण भारतभर ऑनलाईन राष्ट्रीय पात्रता चाचणी घेणार आहे. त्यानंतर व्हिडिओ किंवा प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाईल.
अधिक वाचा : JEE, NEET च्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सरकारी शिकवणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola