शेगाव (योगेश नायकवाडे): शेगाव शहरात अग्रेसन चौक येथे आज सकाळी ८:१५ वा. एस.टी. बस क्रमांक एम एच ४० एन ८६६० बसने एका इसमास चिरडले.या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला.मृत्यू झालेल्या युवकाचे नाव सोनल दादाराव दारोकार असून मु.अटकळी पोस्ट भांबेरी ता.तेल्हारा जि.अकोला येथील रहिवासी होता.
या अपघाताची विचारणा केली असता मिळालेल्या उत्तरामध्ये तफावत आढळत असल्यामुळे पोलिसांच्या माहितीनुसार शेगाव संत नगरीत लागलेल्या सी.सी.टीवी कॅमेराचा आधार घेऊन पुढील तपास करण्यात येईल व या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात येईल.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल रवी माविस्कार करित आहेत.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola