पातुर (सुनील गाडगे): पातुर येथील शिवभक्त कर्नाटक मधील श्री शैलम येथून कावडिने पवित्र जल घेऊन येत असतांना देगलूर ते नांदेड च्या मधात कावड यात्रेला भीषण अपघात झाला आणि त्या मधील दोन शिवभक्ताना आपली जीवन यात्रा संपवावी लागली.
या भीषण दुर्घटनेत संतोष बलीराम हजारे याचा मृत्यू झाला तो विवाहित होता त्याच्या मृत्यू पश्चात त्याला पत्नी आणि तीन लहान चिमुकल्या मूली आहेत त्याचे विधवा पत्नी समोर लहान चिमुकल्याना पालन पोषण करण्याचा प्रश्न बिकट असतांना समाजातील अनेक दान दात्यानी सढळ हाताने संतोष हजारे याच्या विधवा पत्नीला मदत सुद्धा केली यातच आज दिनांक 24/9/2018 रोजी पातुर तहसील चे कर्तव्यदक्ष तहसीलदार मानणीय श्री डॉ. रामेश्वरजी पूरी यांनी संतोष हजारे यांच्या विधवा पत्नीला श्रीमती विजुमाला संतोष हजारे तात्काळ आजच तातडीने अंत्योदय योजनेत राशनकार्ड बनऊन दिले या वेळी पातुर नगर परिषद उपाध्यक्ष श्री राजू उगले ,बांधकाम सभापति श्री अहफाजोद्दीन उर्फ गोरे बाबू , सामाजिक कार्यकर्ते सचिन सुरवाड़े इत्यादी उपस्तित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola