अकोला :- मुलींच्या प्रगतीसाठी राबविण्यात येत असलेली केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा विस्तार करण्यात आला असून अकोला जिल्हयाचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. जिल्हयात ही योजना प्रभावीपणे राबवविण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मुष्टीयोध्दा राष्ट्रीयस्तर सुवर्ण पदक विजेती साक्षी उमेश गायधनी आणि ज्युडो कराटे सुवर्ण पदक विजेती अमृता ढाले यांची सदर योजनेच्या सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली.
बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत जिल्हा अभिसरण कृती समितीची सभा तसेच विजेत्या खेळाडुंचा व प्रशिक्षकांचा सत्कार समारंभ आज जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नियोजन भवनात पार पडला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांनी आपल्या मार्गदर्शनात खेळाचे महत्व विषद केले. प्रशासनाच्यावतीने खेळाडुंना मानसन्मान देण्याबरोबरच गुणवंत खेळाडुंना घडविण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल, तसेच गुरु-शिष्यांच्या निष्ठेने अकोला जिल्हयात विविध खेळांचा प्रचार प्रसार करण्याबरोबरच खेळांडूना योग्य प्रशिक्षण देण्याचे आवाहन त्यांनी केले. याच बरोबर खेळामुळे मिळणाऱ्या प्रसिध्दीचा वापर सामाजिक योजनांच्या यशस्वितेसाठी खेळाडुंनी करावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, क्रिडा प्रशिक्षक श्री. ठाकरे व सतीश भट, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती कुळकर्णी, सदस्य श्रीमती धूत, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती सोनोने, श्री. नागरे, श्री शिवशटये, श्री. राठोड, श्री. नेहरे, श्रीमती लांडे, श्रीमती उईके, श्रीमती उगले यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक तसेच आभार प्रदर्शन श्री. जवादे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद अकोला येथील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
अधिक वाचा : गणेश विसर्जन मार्गाची जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केली पाहणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola