आमिर खानचा महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचा सोमवारी लोगो रिलीज केल्यानंतर आता अमिताभ बच्चन यांचा चित्रपटातील फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बी साकारत असलेल्या भूमिकेचे नाव आणि त्यांचा लूक ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या या मोशन पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे.
The biggest thug of all !!!
Love,
a.@SrBachchan as #Khudabaksh in #ThugsOfHindostan@yrf | @TOHTheFilm | #KatrinaKaif | @fattysanashaikh https://t.co/gfsCJWv5hK— Aamir Khan (@aamir_khan) September 18, 2018
बिग बींच्या भूमिकेची ‘खुदाबक्श, ठग्सचा सेनापती’ अशी ओळख करण्यात आली आहे. प्रेक्षकांना आमिरचा हा चित्रपट ‘लार्जर दॅन लाइफ’चा अनुभव नक्कीच देणार असे म्हणायला हरकत नाही. पोस्टरमधील बिग बींचा अंदाज सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये एका मोठ्या जहाजात उभा असलेला ‘खुदाबक्श’ युद्धासाठी तयार असल्याचे पाहायला मिळत आहे.
आमिर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतच फातिमा सना शेख आणि कतरिना कैफ यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अधिक वाचा : #2Point0Teaser: बहुप्रतिक्षीत ‘2.0’ चित्रपटाचा टीझर लाँच
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola