अकोला(शब्बीर खान) : अकोल्यातील मनकर्णा प्लॉटमध्ये वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळाने यंदा ११०० नारळांची गणेश मूर्ती साकारली असून, १० फूट उंच तर ८ फूट रुंद ही मूर्ती पर्यावरण पूरक असल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली. गवळी पुरा, मनकर्णा प्लॉट या दोन्ही भागाच्या सीमेवर हे मंडळ असून, या मंडळात हिंदू-मुस्लिम पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. मुस्लिम बहुल भागातील हे मंडळ राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत आहे. मूर्ती तयार करण्यासाठी सहा रात्रीचा कालावधी लागला. हनुमान मंदिरासमोर वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळाने गणेशाची स्थापना केली. मंडळातर्फे सामाजिक दातृत्व म्हणून अनेक उपक्रम राबविण्यात येतात. यंदा दंत तपासणी महाशिबिर घेणार आहे. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी त्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
यंदा प्रथमोपचाराचे धडे देण्यात येणार असून, देहदान, नेत्रदानांसाठी अर्जही भरुन देण्याची व्यवस्था करणार आहे, असे बुढन गाडेकर यांनी सांगितले. या मंडळात नितीन चौरसिया, हितेश ठक्कर, अमित तिवारी, भरत पवार, कल्पेश सवैय्या, सुमित सवैय्या, अभिलाष घरडे, गणेश नंदरधने, राम कुरडकर, संजय कुरडकर, शाम आसुले, वैभव माळवी, सूरज मालविया, शुभम शर्मा, छोटू कोरे, जय कोरे, कार्तिक कुरडकर, वेदांत शर्मा, निशांत मात्र, गोपाल धूत, डॉ. आनंद चतुर्वेदी आदींचा समावेश आहे. ३२ वर्षांपासून पर्यावरणपूरक मूर्ती वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ४९ वर्षे आहे. येथे ३२ वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येत आहे. यापूर्वी वाळू, गवत, कापूस, बांगड्या, केळी, भांडे, बिस्किट, साबण, रुद्राक्ष, नोटांपासून गणेश मूर्ती तयार केली होती. गतवर्षी ११ लाखांच्या नोटांची मूर्ती साकारली होती. यासाठी अनेक दानशूरांकडून नोटा जमा केल्या होत्या. त्या नोटा त्यांना परत सुददा करण्यात आले होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola