तेल्हारा(संजय हिवराळे)- तेल्हारा तालूक्यातील तथा जिल्हातील अनेक विद्यार्थ्यांच्या समश्या वाढत चालल्या आहेत त्यासाठी अकोला येथे होणाऱ्या शिक्षण बचाव मोर्चा मध्ये मोठ्याप्रमाणात उपस्थित राहण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलाकडे मात्र हे शासन दुर्लक्ष करित असल्याचे दिसुन येते त्यामध्ये महाराष्ट्रात 65 हजार मराठी शाळा पैकी 22 हजार पटसस्खा अभावी बंद पाडण्यासाठी तयार आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोग बरखास्त करण्यात येवु नये एस.सी, एस.टी, ओबीसी शिष्यवृत्ती वाढविण्यात यावे पि.एच. डी विद्यार्थ्यांची बरती करण्यात यावी समाजकल्याण वसतीगृह विद्यार्थी भत्तात वाढ करण्यात यावी या आणि अश्या अनेक समश्यावर ह्या मेळाव्याच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली ह्यावेळी अकोला येथे 24/9/18 ला शिक्षण बचाव मोर्चा ला उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश खोब्रागडे हे होते त्याचप्रमाणे अमरावती विभागीय अध्यक्ष नितेश किर्तक, अमोल शिरसाट, अकोला जिल्हा अध्यक्ष हितेश जामनिक, जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार दामोदर, जिल्हा संघटक, योगेश किर्तक, विकेश जगताप, जिल्हा सहसचिव स्वप्निल सरकटे, भारिप बमसचे तालुका अध्यक्ष प्रकाश खोब्रागडे, मा.भारिप बमसचे महासचिव प्रदिप तेलगोटे, धिरज वरठे, मा .युवक आघाडी अध्यक्ष प्रा संजय हिवराळे, मगेश वरठे, सुदर्शन बोदळे, दिपक दारोकार, बबलु पठान, प्रफुल मोरे, सुनिल तायडे, मिलींद भोजने, सरपच रक्षित बोदळे, पवन पोहरकार, रवि थोरात, शुभम डीगे, रोशन दारोकार, आकाश शिवनकार, कपिल भोजने, नागेश तायडे ह्यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावीक नितीन बोदळे यानी केले तर संचालक संदेश तायडे ह्यानी केले.
अधिक वाचा : दानापूर येथे किशोरी प्रशिक्षण संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola