नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि देशाची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू यांची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. राजीव गांधी खेलरत्न हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. त्यासाठी निवड समितीने दोघांच्या नावाची शिफारस केली आहे.
निवड समितीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर विराट कोहलीला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला तर हा पुरस्कार मिळवणारा तो देशातील तिसरा क्रिकेटपटू ठरणार आहे. याआधी १९९७ मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि २००७ मध्ये महेंद्र सिंह धोनी याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
वेटलिफ्टर चानू हिने गेल्या वर्षी जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते. यामुळे चानू हिच्या नावाची या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. तसेच तिने ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट मध्ये झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली होती.
अधिक वाचा : पाकिस्तान विरुद्ध खेळणे नेहमी रोमांचकारी – रोहित शर्मा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola