जर केंद्र सरकारने मला परवानगी दिली तर मी पेट्रोल-डिझलेची 35 ते 40 रुपये प्रति लिटर दराने विक्री करु शकतो असं विधान योग गुरू बाबा रामदेव यांनी केलं आहे. सरकारने मला परवानगी दिली आणि जर मला करामध्ये थोड्याफार प्रमाणात सवलत मिळाली तर मी पेट्रोल-डिझेल 35-40 रुपये प्रति लिटर दराने विकू शकतो, असं रामदेव म्हणाले आहेत.
एनडीटीव्हीच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना रामदेव यांनी हे विधान केलं. रविवारी ‘एनडीटीव्ही युवा कॉन्क्लेव्ह’ या कार्यक्रमात महागाईच्या प्रश्नावर बोलताना मोदी सरकारने महागाई कमी करायला हवी असं ते म्हणाले. जर महागाई कमी केली नाही तर सरकारला चांगलाच फटका बसेल. 2019 आधी इंधनाचे दर कमी करा असा सल्ला मी यापूर्वीच मोदी सरकारला दिला आहे. रामदेव पुढे म्हणाले की, जर सरकारने मला पेट्रोल पंप चालवण्याची परवानगी दिली आणि करामध्ये थोडीफार सवलत दिली तर मी संपूर्ण देशात 35 ते 40 रुपये प्रति लिटर दराने विक्री करु शकतो. सरकारने इंधनाला जीएसटीच्या कक्षेमध्ये आणावं असंही ते म्हणाले.
दोन दिवसांपूर्वीही रामदेव यांनी महागाईवरून मोदी सरकारवर निशाणा साधला होता. रुपयाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. रुपयाने ऐतिहासिक नीचांक गाठला आहे. रुपयाची ही अवस्था बघून आता लाजेलाही लाज वाटत असेल, अशा शब्दात त्यांनी टीका केली होती.
अधिक वाचा : स्वच्छता ही सेवा व्हायला हवी : पंतप्रधान मोदी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola