• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोल्यात चलनातुन बाद झालेल्या १५ लाखांच्या नोटा जप्त

City Reporter by City Reporter
June 9, 2020
in Featured, अकोला शहर, गुन्हा, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
79 1
0
अकोल्यात चलनातुन बाद झालेल्या १५ लाखांच्या नोटा जप्त
11
SHARES
573
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(शब्बीर खान)– केंद्र शासनाने चलनातून बाद केलेल्या एक हजार व ५०० रुपयांच्या १५ लाख रुपयांच्या नोटा अकोला स्थानिक गुन्हे शाखेने न्यू राधाकिसन प्लॉट येथील रेड डोअर कॅफेमध्ये बसून असलेल्या दोघांकडून शनिवारी रात्री उशिरा जप्त केल्या. पुणे जिल्ह्यातील दोंड व खामगाव येथील बाळापूर फैलमधील रहिवासी अशा एकूण दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील दोंड येथील रहिवासी सूरज सुनील सोनवणे (२५) व बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील बाळापूर फैलातील रहिवासी प्रकाश नथ्थुजी मोरे (३५) हे दोघे चलनातून बाद झालेल्या नोटा घेऊन न्यू राधाकिसन प्लॉट येथील एका कॅफेत बसलेले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रणजितसिंह ठाकूर यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथकासह धाव घेऊन या कॅफेतील संशयितांची तपासणी सुरू केली असता प्रकाश मोरे व सूरज सोनवणे या दोघांच्या हालचालीवरून त्यांच्याकडे नोटा असल्याचा कयास पोलिसांनी लावला. त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र त्यानंतर दोन्ही आरोपींनी चलनातून बाद झालेल्या नोटा बॅगेत असल्याची कबुली देताच पोलिसांनी त्यांच्याकडून चलनातून बाद झालेल्या एक हजार रुपयांच्या १४६ नोटा म्हणजेच एक लाख ४६ हजार रुपये आणि ५०० रुपयांच्या २ हजार ७०८ नोटा म्हणजेच १३ लाख ५४ हजार रुपये अशा एकूण १५ लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या.

दोन्ही आरोपींविरुद्ध अकोला येथील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या स्पेसिफिक बँक नोटा अ‍ॅक्टच्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे, रणजितसिंह ठाकूर, शक्ती कांबळे, मनोज नागमते, भावलाल हेंबाड यांनी केली .

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

चिमुकल्यांच्या स्वच्छता अभियानाला लोकजागर मंचचे प्रोत्साहन

Next Post

अकोला जिल्हाधिकारी कार्यालया वर चर्मकार समाजाने काढला धडक मोर्चा

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अकोला जिल्हाधिकारी कार्यालया वर चर्मकार समाजाने काढला धडक मोर्चा

अकोला जिल्हाधिकारी कार्यालया वर चर्मकार समाजाने काढला धडक मोर्चा

इस्रो

'इस्रो'कडून दोन ब्रिटीश उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.