नवी दिल्ली : महाराष्ट्र बँकेला हिंदी भाषेत बँकेचे कामकाज उत्कृष्टपणे केल्याबद्दल व्दितीय क्रमांकाच्या ‘राजभाषा कीर्ती पुरस्कारा’ ने आज सन्मानित करण्यात आले.
येथील विज्ञान भवनात आज केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने ‘हिंदी दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रीजीजू, हंसराज अहीर उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रातील शासकीय व खाजगी संस्थांना तसेच व्यक्तिगतरित्या हिंदी भाषेला समृद्ध करणाऱ्या तज्ञांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र बँक दैंनदिन कामकाजाचे कार्यान्वयन हिंदी मध्ये करीत असल्यामुळे ‘राजभाषा कीर्ती’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार उपराष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र बँकेला मिळालेला पुरस्कार बँकेचे कार्यकारी अधिकारी अलेख राऊत यांनी स्वीकारला.
याप्रसंगी हिंदीचे महत्व विषद करीत सामाजमाध्यमांद्वारे तसेच इतर क्षेत्रातही हिंदीचा होत असलेल्या अधिक वापरावर प्रकाश टाकण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघाने हिंदीमध्ये सुरू केलेले ट्विटर हँडल, फेसबुक यावरून हिंदी भाषिकांची जगभरातील संख्या लक्षात येते. हिंदी भाषेत मोठ्या प्रमाणात संदर्भ माहिती निर्मिती होत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री श्री. सिंग यांनी सांगितले.
अधिक वाचा : स्वच्छता ही सेवा व्हायला हवी : पंतप्रधान मोदी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola