खामगाव: लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनानंतर आज १४ सप्टेंबर रोजी खामगाव दौऱ्या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांनी फुंडकर कुटुंबियांची त्यांच्या माधव नगर स्थित “वसुंधरा” निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली.यावेळी लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रतिमेचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांनी दर्शन घेऊन फुंडकर कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी आई श्रीमती सुनिता फुंडकर, सागरदादा फुंडकर, आमदार अँड आकाशदादा फुंडकर व कुटुंबातील इतर सदस्यांशी चर्चा केली. यावेळी श्री भागवत यांनी लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या सोबतच्या सहवासाबाबत काही आठवणींना उजाळा दिला. व आपल्या संवेदना व्यक्त करून लोकनेते स्व भाऊसाहेब फुंडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अधिक वाचा : मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाला कठोर शिक्षा करा- बारी महासंघाची मागणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola