अकोट (सारंग कराळे) : संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय झालेल्या अकोट शहरातील डॉ.श्याम केला यांच्या सिटी क्रिटिकल केअर हॉस्पिटल मधील बोगस डॉ. प्रकरणातील मुख्य आरोपी व बोगस डॉ.निखिल गांधी आज सकाळी १० वाजता आकोट शहर पोलिसांना शरण आला आहे.
या बोगस डॉ.गांधीने आधी अकोटच्या अतिरिक्त सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता त्याला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता,परंतु न्यायालयाने पोलिसांची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्याचा अंतरिम जामीन रद्द केला होता.त्यानंतर या गांधीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता.
नागपूर उच्च न्यायालयात देखील आकोट शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे यांनी तपास अधिकारी या नात्याने प्रकरणातील बारकावे व आरोपींना अटक करणे किती गरजेचे आहे हे न्यायालयाला व्यवस्थित पटवून दिल्याने म.न्यायमूर्तींनी त्याला जामीन नाकारून आकोट पोलिसांचा तपास योग्य दिशेने जात असल्यावर शिक्कामोर्तब केला आहे.याच प्रकरणातील आणखी दोन आरोपी डॉ.श्याम केला व डॉ.धनराज राठी हे अद्यापही फरार असून अकोट पोलीस शोध घेत आहेत.
अधिक वाचा : अकोट मध्ये जेसीआयच्या वतीने ट्रॅक्टराचा अनोखा फॅशन शो!!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola