हॉकी जगतातला सरदार आंतरराष्ट्रीय हॉकीला अलविदा करणार असल्याचे वृत्त आहे. वयाच्या ३२व्या वर्षी त्याने सांगितले आहे की, माझ्या निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे. १२ वर्षांच्या हॉकी कारकीर्दीत मिळालेल्या अनेक मान-सन्मानानंतर निर्णय घेतला आहे. मात्र त्याने असा निर्णय घेण्यामागचे काय असे कारण असा प्रश्न त्याच्या हॉकी चाहत्यांना पडला असेलच.
काही दिवसापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान सरदारने माझ्यात आणखी काही दिवस हॉकी खेळण्याची क्षमता असल्याने मी २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकपर्यंत खेळणार असल्याचे त्याने सांगितले होते. दरम्यान, राष्ट्रीय हॉकी शिबिरासाठीच्या २५ जणांची नावे ‘हॉकी इंडिया’ने घोषित केली. मात्र या यादीमध्ये सरदारचे नाव नसल्याकारणाने निवृत्तीचा निर्णय घेण्यात आला आहे अशी सर्वत्र चर्चा होत आहे.
सरदार शुक्रवारी दिल्लीत अधिकृतरीत्या निवृत्ती जाहीर करणार आहे. राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेतली तरी स्थानिक स्पर्धामधून तो खेळत राहणार असून त्याबाबत प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांना कल्पना देण्यात आली असल्याचे त्याने सांगितले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला विजेतेपद कायम राखण्यात अपयश आल्यामुळे केवळ कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सरदारने सांगितले की, मी माझ्या निवृत्तीचा निर्णय परिवाराला आणि मित्रपरिवारासोबत चर्चा करून घेतला आहे. तसेच तो पुढे म्हणाला, हॉकी सोडुन जीवनात काहीतरी वेगळं करण्याचा विचार आहे. सरदार अधिकृतरीत्या निवृत्तीच्या निर्णयाची घोषणा शुक्रवारी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन करणार आहे.
२००६ साली पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून सरदारच्या भारतीय संघातील कारकीर्दीला प्रारंभ झाला होता. २००८ मध्ये सुलतान अझलन शाह चषकात त्याने भारताचे नेतृत्व केले, तेव्हा तो भारताचा सर्वात युवा कर्णधार ठरला होता. २०१२ मध्ये अर्जुन, तर २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्याला गौरवण्यात आले. त्याशिवाय दोन ऑलिम्पिक स्पर्धामध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
अधिक वाचा : Japan Open: सिंधूला पराभवाचा धक्का, किदाम्बी श्रीकांत चा विजय
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola