अकोला- रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यानंतर बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठीच्या रकमेत पाचपट वाढीचा निर्णय दोन महिन्यांपूर्वीच झाला. मात्र भुसावळ विभागातील काही रेल्वे स्थानक प्रशासन अजूनही एक हजार रुपयांवर पोलिसांची बोळवण करत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या असहकार्याबद्दल रेल्वे पोलिसांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.
भुसावळ विभागातील बडनेरा, शेगाव, अकोला, नांदुरा व मलकापूर येथील रेल्वे पोलिसांना बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी एक हजार रुपयेच मिळत आहेत. रेल्वे अपघातात मृत्यू झालेले, रेल्वे परिसरात आढळलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पूर्वी रेल्वे प्रशासनाकडून पोलिसांना एक हजार रुपये मिळत होते. ही रक्कम अपुरी पडत असल्याने रेल्वे मंत्रालयाने १५ जून २०१८ रोजी पाच पट रक्कम देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय देशातील रेल्वेच्या सर्व विभागांना पत्राद्वारे कळवला. नांदेड, नागपूर विभागात याची अंमलबजावणी सुरु झाली असताना भुसावळ विभागातील काही रेल्वे स्थानक प्रशासनाकडून नवीन आदेशाविषयी अनभिज्ञता दाखवण्यात येत आहे.
एक हजार रुपये रक्कम पोलिसांच्या हातात देण्यात येत असल्याने पोलिसांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त होत आहे. अनेकदा पोलिसांनीच संबंधित रेल्वे स्थानक प्रशासनाला रेल्वे प्रशासनाचा निर्णयही दाखवला मात्र वरिष्ठांकडून लेखी आदेश नसल्याचे कारण समोर करून टोलवाटोलवी सुरु असल्याची भावना पोलिसांनी या वेळी व्यक्त केली.
अधिक वाचा : लोकराज्य विशेषांकाचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते विमोचन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola