अकोला : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या लोकराज्यच्या ‘सामर्थ्य शिक्षणाचे, समृद्ध महाराष्ट्राचे’ विशेषांकाचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, प्र. जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, सहायक माहिती अधिकारी नितीनकुमार डोंगरे उपस्थित होते.
या विशेषांकाचे अतिथी संपादक असलेल्या उद्योजकता व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी शैक्षणिक क्रांती विषयावर संपादकीय मधून राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकला आहे. अंकामध्ये डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, डॉ. भालबा विभूते, डॉ. गो. मा पवार, धनराज माने आदी मान्यवरांनी राजर्षी शाहू महाराज व शैक्षणिक क्रांती या विषयाच्या अनुषंगाने विचार मांडले आहेत. तसेच उद्योजकता व कौशल्य विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या कर्ज व्याज परतावा योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध यशकथा आहे. असा संग्राह्य वाचनीय अंक प्रत्येकाने वाचावा, तसेच लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी यावेळी केले.
अधिक वाचा : शेतकऱ्यांना जलदगतीने पीक कर्ज वाटप करावे -किशोर तिवारी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola