भारताच्या ज्युनियर नेमबाजांनी आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत स्कीटच्या सांघिकमध्ये रौप्यपदकाची कमाई केली, तर वैयक्तिकमध्ये गुरनिहालसिंग गर्चाने ब्राँझपदक मिळवले. भारतीय संघ सात सुवर्ण, ८ रौप्य आणि ७ ब्राँझ अशी एकूण २२ पदकांसह चौथ्या स्थानावर आहे.
गुरनिहाल (११९), अनंतजितसिंग नरुका (११७) आणि आयूश रुद्रराजू (११९) यांनी एकत्रित ३५५ गुण मिळवून रौप्यपदक मिळवले. १९ वर्षीय गुरनिहालने ज्युनियर मुलांच्या गटात स्कीटमध्ये अंतिम फेरीत ४६ गुण मिळवून ब्राँझपदक पटकावले. ही दोन पदके म्हणजे त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. इटलीच्या एलियाने ५५ गुणांसह सुवर्णपदक, तर अमेरिकेच्या निक मॉस्केटीने ५४ गुणांसह रौप्यपदक मिळवले.
सांघिकमध्ये चेक प्रजासत्ताकने ३५६ गुणांसह सुवर्णपदक, तर इटलीच्या संघाने ३५४ गुणांसह ब्राँझपदकाची कमाई केली. ज्युनियर मुलींच्या गटात ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये सांघिकमध्ये भारतीय संघ ३३८३ गुणांसह १४व्या स्थानी राहिला. यात भक्ती खामकर (११३२), शिरिन गोदरा (११३०) आणि आयुषी पोद्दार (११२१) यांचा सहभाग होता. वरिष्ठ महिला गटात भारतीय संघ ३१९ गुणांसह नवव्या स्थानावर राहिला. यात रश्मी राठोर (१०८), माहेश्वरी चौहान (१०६) आणि गणेमत सेखोन (१०५) यांना वैयक्तिक गटात अंतिम फेरीही गाठता आली नाही. या स्पर्धेत दहाव्या दिवसापर्यंत भारताच्या दोनच नेमबाजांनी ऑलिंपिक कोटा मिळवला होता.
अधिक वाचा : जपान बॅडमिंटन स्पर्धा २०१८ : श्रीकांत, प्रणॉय, सिंधूची विजयी सलामी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola