अकोट : अकोट शहर पोलिसांनी अकोट शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला चायना मांजा दोन विक्रेत्यांवर रेड करुन 2,500/- रु चा चायना मांजा जप्त केला. दि 10/09/18 रोजी मिळालेल्या गुप्त बातमी वरुन गाजी प्लॉट अकोट येथे फिरोज खा इस्लाम खा वय 41 वर्ष रा गाजी प्लॉट अकोट याचे किराणा दुकान मध्ये रेड केली असता त्यांचे जवळ दुकानात चायना मांजा कि 1,500/- रु चा मिळुन आला तसेच इक्तेगार प्लॉट अकोट येथे इरफान खा अहमद खा वय 32 रा इखतेगार प्लॉट अकोट येथे त्यांचे स्टेशनरी दुकानात रेड केली असता त्यांचे जवळ दुकानात चायना मांजा की 1,000/- रु चा मिळुन आला प्रतिबंधीत चायना मांजा हा त्यांनी आपले फायद्यासाठी दुकानात विक्री साठी ठेवला असल्याने त्यांचे विरुध्द कलम 290 भा द वि प्रमाणे गुन्हे दाखल केले सदर कारवाही पो नि गजानन शेळके साहेब यांचे मार्गदर्शनाखाली डी बी पथकचे स पो नि ज्ञानोबा फड पोउपनी महेंद्र गवई, पोहेका संजय घायल, नापोका राकेश राठी, गोपाल अघडते, पो का सुलतान पठाण, विजय सोळंके यांनी केली.
अधिक वाचा : प्रहारचे जनसेवेत आणखी मोठे पाऊल तक्रार निवारण व रुग्णसेवा हेल्पलाईने मुबंई येथे उदघाटन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola