तेल्हारा : रविवारी पोळा हा शेतकऱ्यांचा मुख्य सन साजरा झाला. पोळ्याच्या दुसऱ्यादिवशी म्हणजे पोळ्याच्या करीच्या दिवशी सातपूळ्याच्या पायथ्याशी असलेल्या तेल्हारा तालुक्यातील वारी हनुमान येथे आदिवासी समाजाची यात्रा भरते. पोळा झाला कि दुसऱ्या दिवशी शेतकरी राजा आपल्या बैलांना वारी येथील हनुमंत रायाच्या दर्शनाकरिता घेऊन येतो. मात्र आदिवासी नागरिक या दिवशी हनुमंत रायाची या त्यांच्या कुलदेवतेची पूजा करून पोळा थोड्या वेगळ्या प्रकारे साजरा करतात.या दिवशी वारी हनुमान येथे यात्रेचे स्वरूप येऊन दुरुदुरून येथे नागरिक दर्शनाकरिता येतात.
आदिवासी परंपरेनुसार प्रत्येक आदिवासी गावाच्या सीमेवर कुलदेवतेच्या दगडी मूर्तीची स्थापना केलेली असते. आणि करीच्या दिवशी सर्व आदिवासी बांधव एकत्र येऊन वाघहनुमंताची पूजा करतात. या दिवशी या गावात यात्रा भरते. यावेळी कुल दैवत असलेल्या देवतेला स्मरण करून हे वाघदेवा, नागदेवा आमचे गाय गुरे गुराखी यांच जंगलात फिरताना रक्षण कर कुठलीही इजा करू नको. आमची ही लक्ष्मी आहे हे तुझं भक्ष्य होऊ देऊ नको अशी प्रार्थना केली जाते. यामध्ये लहान मुलांनाचा उत्साह मोठा असतो.
वारी हनुमान येथील मंदिराची स्थपना स्वामी रामदास यांनी केली असून, यात्रेच्या दिवशी विधीवत पूजा झाल्यानंतर ही आदिवासी मुलं आनंद उत्सव साजरा करतात. हा सोहळा बघण्यासाठी पंचक्रोषीतील नागरिकांची मोठी गर्दी होते. वर्षानुवर्षे हा आदिवासी बांधव अजूनही अनेक अडचणीला तोंड देत आहे. आदिवासी समाज असलेल्या शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचत नसल्याची खंत समाजसेवक व्यक्त करत आहेत.
व्हिडिओ बघा : व्हिडिओ: तेल्हारा येथे भारत बंद ला उस्पुर्त प्रतिसाद
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola