नवी दिल्ली – इंधन दरवाढ तसेच वाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसनं ‘भारत बंद’ची हाक आज दिली होती. देशभरातील जवळपास २१ पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला होता. या बंदला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून भाजपने दुपारीच घाईघाईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. दरम्यान, भाजपाचे नेते आणि केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे पेट्रोल – डिझेल तसेच इतर इंधनाचे दर वाढले आहेत, असं स्पष्ट करून आमच्या हातात काहीच नाही असा थेट संदेश देऊन हात वर केले आहेत.
आम्ही जनतेसोबत आहोत आणि सामान्यांच्या त्रासाची आम्हाला पूर्ण कल्पना आहे, परंतु पेट्रोल–डिझेलचे दर नियंत्रित करणे आमच्या हातात नाही असं सांगत पूर्णपणे हात झटकले आहेत. विरोधक रस्त्यावर उतरले असले तरी आज देशात काय सुरू आहे? पेट्रोल पंपांवर तोडफोड सुरू आहे. बसेस जाळल्या जात आहेत. त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे,’ असं भावनिक विधान पुढे करत मूळ महागाईच्या विषयाला बगल देण्याचा केविलवाणा प्रयत्नं त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
काँग्रेस पक्ष सध्या नैराश्याच्या गर्तेत सापडला आहे. त्यातूनच त्यांनी भारत बंदची हाक दिल्याचा टोला रवी शंकर प्रसाद यांनी लगावला. परंतु सरकार नेमकं सर्व महागाई कमी करण्यासाठी काय उपाय योजना करणार यावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.
अधिक वाचा : मोदी सरकारने देशहित नसलेल्या अनेक गोष्टी केल्या : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आरोप
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola