तेल्हारा (प्रतिनिधी) : तेल्हारा तालुक्यातील आडसूळ फाट्यावर आज किरकोळ कारणावरून बस वाहकाला मारहाण केल्याची घटना आज सायंकाळी घडली याबाबत सदर नागरिका विरुद तेल्हारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की तेल्हारा आगाराची बस क्र एम एच ४० एन ९८९४ अकोल्यावरून तेल्हारा येत असताना कारंजा येथून एक विद्यार्थी बस मध्ये बसला यावेळी वाहक सागर मेटांगे यांनी सदर विद्यार्थ्यांला टिकिट मागितले असता त्याने हाफ तिकिटाचे पैसे दिले.
यावेळी वाहक यांनी त्याला फुल तिकीट काढावे लागणार असे सांगितले.यावेळी हा किरकोळ वाद वाहक व त्या विद्यार्थ्यांत झाला.बस आरसुळ फाटा येथे आली असता सदर विद्यार्थी बस खाली उतरला व अचानक बस आरसुळ येथील काही नागरिक बस मध्ये चढून वाहकाला बसच्या खाली उतरऊन शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी चालक मद्यस्ती करण्यासाठी गेले असता त्यांना सुद्धा मारहाण करून आरोपींनी त्यांच्या बोटाला चावा घेतला. यावेळी आरसुड येथील परिस्थिती बाबत तेल्हारा पोलिसांना माहिती दिली असता तेल्हारा पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली व वाहक चालकाने बस थेट पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करणारे धीरज सदानंद नवलकर, देवानंद वासुदेव नवलकर, तानाजी पुनजी खंडारे व इतर यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली. त्यावरून तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिस करीत आहेत.
अधिक वाचा : मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाचा संतापलेल्या पित्याने केली चाकूने वार करून हत्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola