भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत. माहितीनुसार अनिल कुंबळे यांची दिल्ली डेअरडेविल्स संघासोबत चर्चा सुरु असून, सर्व गोष्टी ठरवल्याप्रमाणे झाल्यास अनिल कुंबळे आगामी हंगामात दिल्लीच्या संघाचे मार्गदर्शन म्हणून काम करताना दिसू शकतात. २०१८ साली झालेल्या आयपीएलमध्ये दिल्लीचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर राहिला होता.
आम्ही सध्या अनिल कुंबळेसोबत चर्चा करत असून, ते मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी तयार झाल्यास आम्हाला नक्कीच आनंद होईल, अशी प्रतिक्रीया दिल्लीचे संघमालक पार्थ जिंदाल यांनी दिली आहे. दिल्ली संघाशी करार झाल्यास अनिल कुंबळे रिकी पाँटींगसोबत संघाला मार्गदर्शन करताना दिसतील. याआधीही २०१५ सालात कुंबळे आणि पाँटींग यांनी मुंबई इंडियन्स संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी पार पाडली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव गांगुलीने दिल्लीच्या संघ व्यवस्थापनाला मार्गदर्शक पदासाठी कुंबळेचं नाव सुचवलं. त्यामुळे आगामी हंगामात कुंबळे आपली नवीन इनिंग दिल्लीसोबत सुरु करतात का याकडे सर्वांचं लक्ष असेल.
अधिक वाचा : नेमबाज हृदय हजारिकाला ‘सुवर्ण पदक’
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola