भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव गेल्या ११ दिवसांपासून वाढतच आहेत. आज पुन्हा पेट्रोलच्या किंमतीत २० पैसे तर डिझेलच्या दरात २१ पैशांची वाढ झाली आहे. दरम्यान माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नावर धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतात इंधन दरवाढीचा भडका उडाला असताना आपण इतर देशांना मात्र स्वस्तात पेट्रोल आणि डिझेलची विक्री करत आहे
मुंबईत पेट्रोलचे दर ८७ रुपये प्रतिलिटर झाले आहेत. मात्र, मॉरिशिअस आणि मलेशियाला यापेक्षा निम्म्या किंमतीत विकले जात आहे. याबाबत आरटीआय कार्यकर्ता रोहित सभरवाल याने पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या एका सरकारी कंपीनीकडून याची माहिती मागवली होती. इतर देशांना स्वस्त दरात पेट्रोल दिले जात आहे. मात्र, भारतात करामुळे जास्त दराने पेट्रोल विकले जात असल्याचे रोहित सभरवालने म्हटले.
आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार भारत मॉरिशिअसला पेट्रोल ३६ रुपये ३० पैसे दराने तर डिझेल ३७ रुपये ०६ पैसे दराने विकते. तर युएईला ३३.८४ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोलची निर्यात होते. याशिवाय हाँगकाँग ३८ रुपये २६ पैसे आणि सिंगापूरला ३८ रूपये ३१ पैसे दराने पेट्रोल दिले जाते. यात मलेशियाला ३६ रुपये ०८ पैसे दराने पेट्रोलची निर्यात केली जाते.
पेट्रोलियम मंत्रालयनोही म्हटले आहे की, १ जानेवारी २०१८ ते ३० जून २०१८ च्या दरम्यान पेट्रोल १५ देशांना आणि डिझेल २९ देशांमध्ये निर्यात करण्यात आले. देशातील तेलाच्या वाढत्या दराबाबत अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले होते की, गेल्या काही महिन्यांत कच्च्या तेलाच्या किंमतीत वेगाने बदल होत आहे. कधी दर वाढतो तर कधी कमी होतो. अशा परिस्थितीत कोणताही निर्णय घेण्याची घाई करणे आवश्यक नाही.
अधिक वाचा : IndiGo Airlines sale: ९९९ रुपयांत करा विमानप्रवास!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola