अकोट (प्रतिनिधी): अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन शेळके अकोट शहरात सोशल पोलीसींग करुन अनेक सामाजिक उपक्रम अकोट शहरात राबंवत आहेत त्यापैकी आता नवीन प्रयोग करुन कावड उत्संवात शिवाजी महाविद्यालयाच्या ४० एन सी सी कॅडेट ला कावड यांञा उत्संव बदोंबस्तात सामील करुन घेत यावर्षी अकोट शहरात पार पडलेल्या भव्य कावड उत्सवात अकोट शहर ठाणेदार गजानन शेळके ह्यांनी पोलिस अधीक्षक राकेश कलासागर,व उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे ह्यांचे मार्गदर्शनात हा प्रयोग राबविला,यावर्षी अकोला व अकोट येथे एकाच वेळी कावड उत्संव असल्याने गांधी ग्राम,अकोला व अकोट येथे एकाच वेळी बंदोबस्त असल्याने अकोट शहराला अत्यांल्प बंदोबस्त प्राप्त झाला होता.
अकोट शहराची संवेदनशीलता व कावड मिरवणुकीचा लांब मार्ग पाहता बंदोबस्ताचे योग्य नियोजन करून बंदोबस्त करणे गरजेचे होते त्यासाठी ठाणेदार शेळकेनी प्रथमच शिवाजी चौक ते अकोला नाका हा रस्ता चारचाकी वाहना साठी सकाळी ७ ते १ वाजे पर्यंत बंद ठेवण्यात आला, त्या साठी अकोट बसडेपो व्यवंस्थापक याच्यासी सोबत चर्चा करून बसफेऱ्या चे नियोजन करण्यात आले, देवरी फाट्यावरच जड वाहतूक थांबवून ठेवण्यात आली होती.वाहतुक बंद बाबत सर्व प्रकारचे प्रसिद्धी माध्यमाचा योग्य वापर करुन शिस्तंबध नियोजन केल्याने कावड मडंळाना यापुर्वी शिवाजी चौकात लेझीम व इतर वेगवेगळ्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण करता येत नव्हते, परंतु वाहतुकीच्या उत्तम नियोजना मुळे,सर्व कावड मंडळाला आपल्या कलेचे सादरीकरण करण्याची संधी मिळाल्यामुळे शिवभक्त उत्साहाचे वातावरण दिसत होते.
शेवटच्या टप्प्यात सराफा लाईन नंतर वाद्यांची वाहने तापेश्वरी मंदिराकडे न जाऊ देता सरळ सोनू चौकाकडे पाठविल्याने,जास्त कावळ मदिराकडे जाऊ शकल्या वेळ पण वाचला यावर्षी पक्ष सामाजिक सघंटना कडुन शिवभक्ताचे स्वागत व फराळ वाटपाचे प्रमाणात वाढ झालेली दिसली कावड याञा उशिरा सुरु होऊन सुद्धा योग्य नियोजनामुळे लवकर सपंली कावड मिरवणुकीत कोठेही पोलिस व शिवभक्ता मध्ये संघर्ष दिसूनआला नाही,उत्सांहाच्या वातावरणात कावड याञा उत्संव शातंतेत व सुव्यंवस्थेत पार पडली यासाठी शिवाजी महाविद्यालयाचे एन.सी.सी.कँडेट देण्यासाठी प्राचार्य डॉक्टर अंबादास कुलट व प्राध्यापक प्रशांत कोठे ह्यांचे सहकार्य लाभले तसेच सर्व शिवभक्त कावड मडंळ समिती व नागरीकानी पोलीस निरीक्षक गजानन शेळके सोशल पोलीसीग चे कौतुक करत आभार मानले.
अधिक वाचा : प्रहार जनशक्ती पक्षाने घातला जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना घेराव
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola