तेल्हारा(शुभम सोनटक्के)- तेल्हारा येथे कावड यात्रेचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो.यावर्षी देखील शहरातील जय भवानी मंडळ ,न्यू भवानी मंडळ ,व एकता मंडळाच्या वतीने कावडयात्रा काढण्यात आली .आडसूळ येथील पूर्णा नदीपात्रातून पवित्र जल रात्रभर पायी चालत कावडधर्यानी आपल्या कावड आणल्या .तसेच शहरातून टावर चौक ,स्थित जनता बँक परिसरातून श्री गौतमेश्वर संस्थान पालखीची आरती व पूजन करून कावड शोभायात्राला सुरुवात झाली हि शोभा यात्रा पोलीस स्टेशन ,संताजी चौक ,प्रताप चौक , बजरंग चौक ,संभाजी चौक ,शिवाजी चौक ,आठवडी बाजार,तानाजी चौक ,येथून जाऊन गौतमेश्वर संस्थान येथे गौतमेश्वराला जलअभिषेक अर्पण करण्यात आला .कावड यात्रे दरम्यान बजरंग चौक व शिवाजी चौक यांच्या वतीने पाणी व संभाजी चौक येथे फराळ व दुध वाटप करण्यात आले होते .गौतमेश्वर संस्थान येथे गौतमेश्वर शिव भक्त मंडळाच्यावतीने कावडधार्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी श्री गौत्मेश्वराची शिव आरती करून या उत्साहाची सांगता करण्यात आली . या कावड यात्रे दरम्यान शहरातील तरुणांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता यावेळी शहरातील नागरिकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य केल्याबद्दल व पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन केल्या मुळे कावड यात्रा शांततेने संपन्न झाली.
अधिक वाचा : तेल्हारा खविसं अध्यक्षाविरूध्द अविश्वास प्रस्ताव दाखल, राजीनामा खरा की अविश्वास
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola